breaking-newsपिंपरी / चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रहाटणीत बोधिवृक्षाचे रोपण

नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे अनोख्या पद्धतीने महामानवाला अभिवादन

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

भारतातल्या शोषित, वंचीत, पिडित माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणाऱ्या प्रज्ञासूर्य, महामानव डॉ.बाबासाहेबांच्या 129 व्या जयंती निमित्त नगरसेवक बाबा त्रिभुवन यांनी सोशल डिस्टनिंग पाळून आपल्या सोसायटीच्या आवारात बोधिवृक्षाचे रोपन करून अनोख्या पद्धतीने महामानवास अभिवादन करून जयंती साजरी केली.

कोरोना विषाणूच्या सावटाखाली यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व अनुयायांनी आपापल्या घरीच उत्साहात साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेवक त्रिभुवन यांनीही काल स्वतः पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला हे आवाहन केले होते.

आज त्यांनी स्वतः लॉकडाऊनचे नियम पाळत आपल्याच सोसायटीच्या आवारात जयंतीनिमित्ताने ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती होऊन सम्यक संबुद्ध झाला. जे बोधिवृक्ष सतत चोवीस तास आपल्याला शुद्ध अॉक्सिजन देते. महान सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी या बोधिवृक्षाची एक शाखा(फांदी) अनुराधापुर, श्रीलंका येथे नेऊन तिचे रोपण केले आहे. अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या व सर्व प्राणिमात्रांविषयी ममत्वभाव असलेल्या बोधिवृक्षाचे रोपण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष राहूल भोसले हे उपस्थित होते.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपापल्या घरीच सुरक्षित परंतु उत्साहात जयंती साजरी करावी. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सर्वात मोठ्या पवित्र ग्रंथाचे अर्थात भारतीय संविधानाचे सर्वांनी वाचन करावे, असे आवाहन शेवटी नगरसेवक त्रिभुवन यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button