breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयात माझी वसुंधरा अभियान
पिंपरी | प्रतिनिधी
ताथवडे येथील डॉ. डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीच्या डॉ. डी. वाय.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती व ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले. यावेळी सर्वांना हरीत शपथ देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद पाटील, सुरज आढाव आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील व सचिव डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रा. रविकांत शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शरद जगताप यांनी आभार मानले.