डुक्करमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महापालिका प्रशासनाची ‘धरपकड’ मोहीम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/1-3.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने डूकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज केलेल्या कारवाईत सुमारे १०८ डूकरे पकडण्यात आली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात असणाऱ्या डूकरांमुळे निर्माण होणारा सार्वजनिक उपद्रव व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे यांच्या पथकाने आज पासून कारवाई सुरू केली.
![](https://i1.wp.com/mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/DSC_7250.jpg?fit=1024%2C553&ssl=1)
मनपाच्या वीस कर्मचा-यांच्या पथकामार्फत डूकरे पकडून त्याची विल्हेवाट लावण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार डूकरे पकडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. आजच्या या कारवाईत थेरगाव, भाटनगर, डालको कंपनी परीसर व लिंक रोड पिंपरी भागातील सुमारे १०८
डूकरे पकडण्यात अली. या कारवाईत दरम्यान डूकरे पाळणाऱ्या व्यावसायिकांकडून विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापी पोलिस निरीक्षक विरेंद्र चव्हाण यांनी त्यांच्याशी समन्वय साधून केलेल्या कारवाईला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यापुढेही महापालिकेमार्फत मोकाट व भटकी डूकरे पकडण्याची विशेष मोहिम अधिक प्रभाविपणे राबविण्यात येणार असून लवकरात लकर शहर डूकरमुक्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी केले.