टिकटॉकच्या माध्यमातून पुन्हा दहशत पसरविणारा व्हिडिओ व्हायरल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/18351-tiktok1_201905237335.jpg)
- काही तरुणांना पोलिसांनी केली अटक
पिंपरी – सांगवी येथे दहशत पसरविण्याच्या उद्धेशाने हातात धारदार शस्त्र घेऊन टिकटॉक व्हिडीओद्वारे धुमाकूळ घालण्याची आणखी एक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ४ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यापैकी २ दोघांना अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकच्या व्हिडिओ द्वारे दहशत पसरविणाऱ्या तरुणाला मंगळवारी ( दि. १४) पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. बुधवारी पुन्हा टिकटॉकच्या व्हिडिओने तरुणांनी धुमाकुळ घाालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. पिंपरी शहरातील सांगवी परिसरात घडलेली ही घटना आहे. ज्या मध्ये 4 तरुण बंदी असलेल्या हुक्क्याची नशा करत हातात धारदार शस्त्र घेऊन अशा पद्धतीने नाचतांना दिसत आहे. हा व्हिडीओ सांगवी पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत व्हिडीओ मध्ये नाचणाऱ्या अभिजित सातकर, शंकर बिराजदार, ओंकार कांबळे आणि जीवन रावडे नामक चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यातील दोघांना अटक केली आहे ,
दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी असा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.