breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

झोपडपट्टीधारकांचे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

– झोपडपट्टी घरांचे प्रधानमंत्री आवास योजनेतून पुर्नवसन प्रकल्पास विरोध

पिंपरी ( महा ई न्यूज ) – दापोडीतील झोपडपट्टीधारकांनी घरांचे पंतप्रधान आवास योजनेंर्तग पुर्नवसन प्रकल्प करण्यास विरोध करण्यासाठी आज (शनिवारी) महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनामुळे जून्या पुणे-मुंबई पिंपरी, खराळवाडी आणि मोरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 

पिंपरी चिंचवड झोपडपट्टी निमुर्लन व पुर्नवसन प्रकल्पातंर्गत दापोडी येथील झोपडपट्टी परिसरात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तेथील झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन होणार आहे. परंतू, त्या प्रकल्पात दापोडीतील झोपडपट्टीधारकांनी विरोध दर्शवित महापालिकेविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे.

दापोडीच्या जयभीमनगर, लिंबारे वस्ती, सिध्दार्थनगर याठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुर्नवसन प्रकल्प होणार आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. वर्षानुवर्ष स्वतःच्या नावावर घरपट्टी आणि सातबारा असलेल्या जयभीमनगर च्या उताऱ्यावर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुर्नवसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात जाणूनबुजून फसवणूक केल्याचा आरोप दापोडी येथील रहिवाश्यांनी केला आहे. शासनाने आमचा विश्वासात केला आहे असेही नागरिक म्हणाले.

घरमालकांच्या एक ते चार गुठ्यांच्या जागेपेक्षा जास्त मालकी हक्क असून यावर अनेक रहिवाशांची दुमजली घरे आहेत. त्यांना सरकारकडून केवळ २६९ चौ. फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे त्यामुळे दापोडीकरांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुर्नवसन प्रकल्पास विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, दापोडीतील पुनर्वसन प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रवेशद्वाराजवळ हजारोंच्या संख्येने ठीय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button