breaking-newsपिंपरी / चिंचवड

ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती व विकास योजना विभागामार्फत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उद्या (दि. २७) सकाळी दहा वाजता संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे. महापौर उषा उर्फ माई ढोरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे व खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तरी, शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button