breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे-मुंबई महामार्गावर एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक (video)

– ‘हॉटेल शिव इन’ मधील दत्ता पाटोळे यांचे साहसी मदतकार्य

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बसने पुन्हा एकदा पेट घेतला आहे. कासारवाडीजवळ ही बस जळून खाक झाली आहे. शिवशाहिच्या दुर्घटना वारंवार घडत असताना आज पिंपरी-चिंचवडमध्ये या बसने पेट घेतल्याने एसटी महामंडळाच्या कार्यपध्दतीत त्रुटी वाटू लागल्या आहेत.

सुदैवाची बाब म्हणजे यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. भोसरी येथून शिवाजीनगरच्या दिशेने बस जात होती. मात्र, अचानक सकाळी सातच्या सुमारास कासारवाडी याठिकाणी बसने पेट घेतला. रात्री भोसरी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये बस मुक्कामी होती.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास शिवाजीनगर बस बसस्थानकातून शिवाजी नगर ते श्रीरामपूर शिवशाही बस (एमएच १४ जीयू २३१०) सुटणार होती. परंतु, त्या अगोदरच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर कासारवाडी येथे शिवशाहीने अचानक पेट घेतला. चालक पप्पू आव्हाड यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली.  दरम्यान, हॉटेल शिव इन मधील कर्मचारी दत्ता पाटोळे यांनी एबीसी पावडर असलेला सिलिंडर आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्याच्या बाहेर गेली होती.  तसेच, अग्निशमन दलाला फोन करत पाचारण केले. त्यांनी तात्काळ येऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण आणले. सामाजिक बांधिलकीतून पाटोळे यांनी दाखवलेल्या धाडसाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

दरम्यान, शिवशाही बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. अद्याप शिवशाही बसला आग का लागली हे कारण अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे अशोक कानडे यांच्या टीमने आगीवर नियंत्रण आणले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button