जुन्नर तालुका मित्र मंडळातर्फे कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण
![Distribution of Corona Warrior Award by Junnar Taluka Mitra Mandal Junnar Taluka Friends Circle Junnar Taluka Mitra Mandal, MP Dr. Dr. Amol Kolhe, Kovid Medical Officer of Yashwantrao Chavan Hospital. Dr. Vinayak Patil, Head of Ruby Alcare Kovid Intensive Care Unit Ashwini Kadam, social activist Annasaheb Matale, Coroner's Award, former MLA Vilas Lande, NCP city president Sanjog Waghere, labor leader Arun Borhade,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/जुन्नर-तालुका.jpg)
खा. डॉ. अमोल कोल्हे यांची उपस्थिती
पिंपरी | प्रतिनिधी
जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने पर्यटन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा व कोरोनाकाळात जिवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या वैद्यकिय सेवक, सामाजीक व्यक्तीमत्वांचा कोरोनायोद्धा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. राजमाता जिजाऊ महाविद्यालय भोसरी येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण रूगणालयातील कोविड वैद्यकिय अधिकारी डॉ. विनायक पाटील, रूबी अलकेअर कोविड अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. अश्विनी कदम, सामाजीक कार्यकर्ते आण्णासाहेब मटाले आदींना कोविडयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कामगार नेते अरूण बोऱ्हाडे, उत्तम आल्हाट, यश साने, निलेश जाधव, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे व कार्यकारिणी सदस्य व सभासद उपस्थित होते.
पर्यटन दिनदर्शिकेत जुन्नरची रामायणकाळा पासूनची माहिती लिहीणारे अभ्यासक आर.एस.पंडीत सर यांचाही या वेळी खासदारांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी मंडळाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. हे मंडळ माझ्याबरोबर सतत असून मला मोलाची साथ देतात. त्यामुळे समाजाचे देणे लागते त्यामुळे प्राधिकरण कार्यालयातून या मंडळासाठी हॉस्टेलच्या कामासाठी भूखंड देण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडे माजी आमदार विलास लांडे यांनी केली.
डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुका मित्र मंडळाचे हॉस्टेल हे बारामती होस्टेलच्या धर्तीवर असेल व त्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू तसेच पिंपरी चिंचवड मध्ये राहणारे जुन्नरवासीयांच्या एकत्र स्नेहमेळा घेण्यात यावा असे त्यांनी सुचविले. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कोविड वॉर्डात काम करणारे डॉ. विनायक पाटील व त्यांच्या टीमच्या कामाचे कौतुक केले. मंडळाकडून मलाही मोलाची साथ मिळाली. माझ्या याकाळात रस्त्याच्या कामा व्यतिरिक्त लवकरच रेल्वे आराखडा आणून पुणे नाशिक रेल्वेचे काम सुरू करणे हा माझा संकल्प आहे. तसेच तालुक्याच्या विकासासाठी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करत राहणार, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले.
स्वागत अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांनी केले. प्रास्तविक ऍड संतोष काशिद यांनी केले. मंडळाचा कार्यअहवाल, सुत्रसंचालन नवनाथ नलावडे यांनी केले. संयोजन योगेश आमले, उल्हास पानसरे, मिननाथ सोनवणे, ऍड महेश गोसावी, इंद्रजित पाटोळे, श्वेता पाटे , सल्लागार उत्तम महाकाळ, शिवाजी चाळक, भाऊसाहेब कोकाटे, विजय ढगे, अमोल बांगर,नितीन शिंदे. सुनील पाटे. निलेश बोरचटे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार दिपक सोनवणे यांनी मानले.