breaking-newsपिंपरी / चिंचवड

जीम सुरू करण्यास परवानगी द्यावी, जीम व्यवसायिक व कर्मचा-यांचा पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

लॅाकडाऊमुळे गेल्या पाच महिण्यांपासून सर्व जिम व्यवसाय बंद आहेत. यावर अवलंबून असणा-यांवर अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. नियम व अटी घालत अनेक व्यवसाय चालू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. तरी, शहरात बंदी घालण्यात आली आहे. जीम व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत शहरातील जिम व्यवसायिकांनी मनसेच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.

कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्रातील साधारणपणे 15000 जिम चालक, मालक, ट्रेनर, हाउसकीपिंग स्टाफ, योगा टीचर, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशन दुकानाचे मालक, त्यांचे कर्मचारी, न्यूट्रिशन कंपनीचे कामगार, व्यायाम शाळा साहित्य बनवणारे कामगार, तसेच इतर अनेक पूरक व्यवसायातील कामगार हे गेल्या पाच महिन्यांपासून बेरोजगार आहेत. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिम व्यवसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, लाईट बिल, मेंटेनन्स कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. त्यांना आर्थिक पाठबळ देण्यात यावे अन्यथा जिम चालू करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.

गेल्या अनेक महिने या व्यावसायिकांनी संयमाने सरकारी नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य केले. परंतु, अनलॉक प्रक्रीया चालू होऊन देखील त्यांची निराशा झाली आहे. विरोधाभास म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी व्यायाम तितकाच गरजेचा आहे. यासाठी जिम चालू असणे अत्यावश्यक आहे. याउलट रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते असा जिम व्यवसाय बंद आहे. हि मोठी शोकांतिका आहे. यावरून सरकार जिमबाबत किती गंभीर आहे. याची कल्पना येते. सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने मनसेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यात यावी, जिम चालू करण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी, अन्यथा मनसेकडून सर्व जिम चालकांसमवेत तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, चिखले यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button