जिजामाता हॉस्पिटल येथे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी येथील जिजामाता हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय मान्यवर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना सन्मानपत्र देण्यात आले.
महिला सेनेच्या शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकलेल्या कोरोनारुपी संकटाला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वच स्तरावरील सहकाऱ्यांनी एकजुटीने कशाप्रकारे आपापली जबाबदारी पार पाडली या विषयी मनोगत व्यक्त केले. मनसेच्या पदाधकाऱ्यांनी देखिल मनोगत व्यक्त केले. संबोधित करताना वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचे कौतुक केले.
या वेळी किशोर शिंदे, रणजित शिरोळे, सचिन चिखले, अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, सिमा बेलापूरकर, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, हेमंत डांगे, राजू भालेराव, सुशांत साळवी, रूपेश पटेकर, बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी, मिलिंद सोनवणे, दत्ता देवतरसे, निलेश नेटके आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.