breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जाधववाडी, चिखली विविध विकास कामांचा शुभारंभ

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील जाधववाडी, चिखली येथे विविध विकास कामांचा आज (गुरुवारी) शुभारंभ आमदार महेश लांडगे यांचे हस्ते झाला. यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसदस्या अश्विनी जाधव, सारिका सस्ते (बो-हाडे), साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे आदी उपस्थित होते.

चिखलीतील साई जीवन शाळेजवळील मैदान विकसित करणे, जाधववाडीतील माध्यमिक शाळेची इमारत बांधणे, बो-हाडेवाडीत गायरान जागेवर शाळा इमारत बांधणे, डीपी व नॉन डीपी रस्ते विकसित करणे, हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करणे, तसेच सेक्टर १६ राजे शिवाजीनगर भागातील काँक्रीटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

तळई गार्डन परिसर विकास प्रकल्पाचे व चिखली गावातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. तसेच तळई गार्डन लगत सीएसआर मार्फत विकसित ई – टॉयलेट प्रकल्पाचे उदघाटनही या वेळी करण्यात आले. बो-हाडेवाडी येथील शाळेचे जागेचे एकूण क्षेत्रफळ ४१०० चौरस मिटर असून ३६११ चौरस मिटर बांधकाम होणार असून या शाळेस ३ मजले असणार आहेत प्रत्येक मजल्यावर क्लास रुमसह स्त्री/पुरुषांसाठी टॉयलेटसह बाथरुम असणार आहेत. तसेच मोठा हॉल, सायन्स व कॉम्पुयुटर लॅब, तसेच प्रशस्त वाहन तळ असणार आहेत.

या शाळेच्या बांधकामास सुमारे १२ काटी ३८ लाख रुपये इतका खर्च येणार असून या परिसरातील
विदयार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच जाधववाडी येथील गट नं.६०६ आरक्षण क्र.१/४४६ येथे माध्यमिक शाळेच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १५,२९२ चौरस मिटर असून ७६३८ चौरस मिटर इतके इमारतीचे बांधकाम होणार असून यात ४ मजल्यावर ३८ क्लास रुम सह मोठा हॉल, सायन्स व कॉम्पुयुटर लॅब, तसेच प्रशस्त वाहन तळ असणार आहेत. तसेच स्त्री/पुरुषांसाठी
टॉयलेटसह बाथरुम असणार आहेत. या शाळेच्या बांधकामास सुमारे १२ कोटी ९३ लाख रुपये इतका खर्च येणार असून परिसरातील विदयार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button