breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागामालकाकडून रस्त्याची अडवणूक; विद्यार्थी, नागरिकांना होतोय मनस्ताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेने शहरात केलेल्या डांबरीकरण रस्त्यांची मालकी नेमकी कोणाकडे आहे. मालकीहक्क नसताना जागेचे मूळ मालक अरेरावी करत रस्ता अडवित आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा संताप माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, खेड्यापांड्यांचा समावेश होऊन महानगरात रुपांतर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात स्थानिकांनी रस्त्यांसाठी आपल्या जागा महापालिकेला दिल्या. शहरात विविध भागात रस्ते विकासीत केले. काहींनी विनाअट, विनामोबदला जागा दिल्या. रस्तेविकासामुळे झपाट्याने शहराचा विकास झाला. महापालिकेने मुरुमीकरण आणि डांबरीकरण केले. काही ठिकाणी अधिकृत बांधकाम परवानग्याही दिल्या. त्यामुळे नागरिकरण मोठ्या प्रमाणावर झाले. आता काही मूळ मालक रहिवाशांना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने डांबरीकरण केलेले सार्वजनिक रस्तेच अडवित आहेत.

त्यामुळे रहिवाशांची कोंडी होत आहे. महापालिका अधिका-यांकडे तक्रार केल्यावरही त्याची दखल घेतली जात नाही. स्मार्ट सिटीकडे पिंपरी- चिंचवडची वाटचाल सुरु असताना रस्त्यांसाठी होणारी अडवणूक संतापजनक आहे. महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करुन सार्वजनिक रस्ते पुर्ववत खुले करावेत, मूळ जागामालकांनी महापालिकेशी संपर्क साधत जागेचा मोबदला घ्यावा. नागरिकांना विनाकरण मनस्ताप देऊ नये, अशी विनंतीही तापकीर यांनी केली आहे.

रस्त्यातच ध्वजवंदन कार्यक्रम घेणार

काळेवाडीतील तापकीरनगरमध्ये लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर आणि एलबीटी इंग्लिश मीडियम स्कुल असा शैक्षणिक परिसर आहे. आजुबाजूच्या परिसरात 100 घरे आहेत. या परिसरासाठी 20 वर्षांपुर्वी सार्वजनिक रस्त्याची निर्मिती झाली. डांबरीकरण झाले. आता काहीजण हा सार्वजनिक रस्ता खडीमुरुम टाकून अडवित आहेत. त्यामुळे सुमारे 2 हजार 600 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रहिवासी मेटाकुटीस आले आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिका अधिका-यांच्या ’धृतराष्ट्र’ भुमिकेमुळे प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावर अनिश्चिततेचे सावट आले आहे. महापालिकेने पुढाकार घेत सार्वजनिक रस्ता खुला न केल्यास तापकीर चौकात विद्यार्थी- पालकांसह ध्वजावंदन कार्यक्रम घेण्याचा इशारा तापकीर यांनी निवेदनातून दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button