breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतिक योग दिनानिमित्त पूर्णानगरमध्ये ४०० नागरिकांना वृक्ष वाटप

पिंपरी – जागतिक योग दिनानिमित्त एकनाथदादा पवार युवा मंचच्या वतीने पूर्णानगर प्रभाग क्रमांक 11 येथील शनिमंदिर मैदानावर योगसाने व प्राणायामांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये परिसरातीलस सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग घेत योगसाने व प्राणायमाचे प्रात्याक्षिके केली. तसेच या वेळी वृक्षवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यात 300 वृक्ष वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, उद्योजक संजय नेवाळे, संदीप मांगवडे, राजू वायसे, विजय घोडके, सुनील डोमाटे, सारिका पवार, कविता हिंगे, सुनीता जगताप, बाळासाहेब गंगावने ,भाजप उपाध्यक्ष गंगाधर मांडगे, तात्या भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

21 जून हा आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. संपुर्ण जगभरात भारताचे वैशिष्ट असेलल्या योगाभ्यासाला महत्त्व आले आहे. एकनाथदादा पवार युवा मंचच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त योगसाने व प्राणायामासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तज्ञ योग गुरू रवींद्र बराटे आणि संदीप आल्हाट यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, मुद्रा, आसन, ध्यान याचे प्रात्याक्षिके करून दाखविली, उपस्थितांना योगा अभ्यासाविषयी माहिती दिली.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, योगाची व्याप्ती खूप मोठी आहे. शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगासने व प्राणायाम आवश्यक आहे. योग ही सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा केवळ एका दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस न राहता आपल्या सगळ्यांची दैनंदिन योगाकडे वाटचाल घडवणारा ठरायला हवा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button