breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जयप्रभा माधव चिलेकर यांचे निधन
![Jayaprabha Chilekar passes away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/चिलेकर.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
जयप्रभा माधव चिलेकर (वय 75) यांचे शनिवारी (दि. २) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात जयप्रभा चिलेकर यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री सव्वा बारा वाजता त्यांची प्राणजोत मालवली. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्यविधी झाला. या वेळी राजकीय, सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या त्या मातोश्री होत.