breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिखली येथील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिखली–जाधववाडी चिखली येथे रंजन वजन काट्याजवळ एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

येथील रंजन वजन काट्या जवळ असलेल्या एका लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी तीनच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच चार बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून घटनेत कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button