breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिखली, जाधववाडीत अतिक्रमणांवर धडक कारवाई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग २ मधील चिखली- जाधववाडी येथील अतिक्रमणांवर महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण, निर्मूलन विभागाने आज धडक कारवाई केली.

चिखली आकुर्डी रस्ता नाल्यानजीकच्या गट नं ८९१ येथील एकूण ११ अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर (क्षेत्रफळ अंदाजे ५६४५ चौ.फुट ) कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहशहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button