breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिखलीतून दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखलीतून दोन सक्क्या बहिणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी एका रिक्षा चालकावर संशय घेतल्याने त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
रिक्षा चालक प्रतिक (पूर्ण नाव माहित नाही, रा. पालघरे वस्ती, लांडगे चाळ, कुदळवाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार त्यांच्या दोन्ही मुलींसह पालघरे वस्तीत राहतात. एक मुलगी 18 वर्षे आणि दुसरी 16 वर्षाची असून दोन्ही मुली गुरूवार (दि. 3) पासून बेपत्ता आहेत. रिक्षाचालक प्रतिक यानेच अमीष दाखवून मुलींना पळवून नेण्याची तक्रार मुलींच्या वडिलांनी केली आहे. त्यानुसार रिक्षाचालक प्रतिक याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.