breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीतील ‘विनायकआबा’ कडे नागरिकांनी मांडले गा-हाणे

नुतन वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे वाटप; प्रभाग क्रमांक ‘एक’ मध्ये समस्यांचा डोंगर

पिंपरी |महाईन्यूज|

चिखली प्रभाग क्रमांक एक मधील युवक नेते विनायकआबा मोरे आणि भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनमताई मोरे यांनी नुतन वर्षानिमित्त नागरिकांना घरोघरी दिनदर्शिकेचे वाटप केले. या वाटपावेळी प्रभाग एकमधील विविध सोसायट्यांतील नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा मांडल्या. प्रभागातील पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज या मुलभूत सोयीसुविधा पूर्ण कराव्यात, अशी मागणी सोसायट्यांच्या सदस्यांनी केली.

प्रभाग एकमधील नागरिकांना अजूनही मुलभूत सुविधा पूर्णपणे मिळालेल्या नाहीत. प्रत्येक सोसायट्यांमध्ये कुठल्या न कुठल्या समस्या आहेत. या समस्यां सुटण्यासाठी नागरिकांनी विनायक आबा मोरे यांच्याकडे गाऱ्हाणी मांडत त्या सोडवण्याची मागणीही केली आहे. नुतन वर्षानिमित्त विनायक आबा मोरे स्पोर्टस फाऊंडेशनच्या आणि भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनम मोरे यांच्या माध्यमातून दिनदर्शिकेचे वाटप सुरु आहे. प्रभाग एकमधील प्रत्येक सोसायट्यांमध्ये या दिनदर्शिका स्वतः जाऊन भेट दिल्या जात आहेत. यावेळी महिलांसर्दभातील विविध समस्या तसेच सोसायट्यांच्या समस्या मांडल्या जात आहेत. या समस्या मोरे दाम्पत्यांकडून सुटतील अशी आशा या नागरिकांना आहे.

नुतन वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे चिखली प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांना वाटप करण्यात आले.

दिनदर्शिका वाटप करत असताना, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी रस्टीक कॉलनीमध्ये गढूळ पाण्याची तक्रार करण्यात आली. तर अभंग विश्व, मीरा आर्केड आणि गवारे अंगण समोरील सोसायटी रस्ता रखडलेला आहे. यासोबतच पाणी लाईट याचीही गैरसोय असल्याचे नागरिकांनी सांगितले. साई एक्झोटीका सोसायटीमध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. तसेच धर्मराजनगरमध्ये रात्रीच्या वेळी मद्यपाण कऱणाऱ्या तळीरामांचा सोसायट्यांना मोठा त्रास होतो आहे. याबाबत भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सोनम मोरे यांनी संबधिंत विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक यांच्याकडे तक्रार मांडली आहे. डेस्टीनेशन मेमॉईर सोसायटी समोरील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
परिसरातील या सर्व समस्या आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा शब्द या मोरे दाम्पत्यांनी नागरिकांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button