breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभा भाजपाचा अभेद्य किल्ला : आमदार महेश लांडगे

भाजपाच्या चिंचवड-किवळे मंडलाची कार्यकारिणी जाहीर

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात आवाहन

पिंपरी । प्रतिनिधी

’चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला व तो असाच अभेद्य व तो अजून मजबूत करण्याचे कार्य करण्यासाठीच संघटनेने आपण सर्वांना जबाबदारी दिली आहे. त्याचे आपण पालन केले पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या ‘चिंचवड -किवळे मंडलाच्या जंम्बो कार्यकारिणीची घोषणा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम सोशल डिस्टंसच्या सर्व नियंमांच पालन करीत चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे व पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवि अनासपुरे यांनी मंडलाच्या नवनिर्वचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ममता गायकवाड, माजी उपमहापौर झामाताई बारणे, नगरसेवक राजेंद्र गावडे, संदिप कस्पटे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, नगरसेविका आरती चौंधे, माजी नगरसेवक संतोष बारणे, ब’प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, विठ्ठल भोईर, महीला शहराध्यक्ष उज्वला गावडे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जगताप, भाजयुमोचे शहर सरचिटणीस अजित कुलथे, जेष्ठ कार्यकर्ते रविंद्र देशपांडे, विजय शिनकर, काळूराम बारणे, गणेश गुजर आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सोशल डिस्टंसचे अतिशय काटेकोरपणे पालन करीत झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे यांनी केले.

सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे यांनी प्रास्ताविक तर बिभीषण चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button