breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड, भोसरी, पिंपरीत कोण मारणार बाजी? उमेदवारांची वाढली धाकधूक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

उद्या शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य सिध्द होणार आहे. मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी उमेदवारांसह कट्टर कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच धाकधूक वाढली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि भोसरी या दोन मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवडमधून भाजपचे लक्ष्मण जगताप आणि अपक्ष राहूल कलाटे यांच्यात लढत झाली आहे. भोसरीतून भाजपचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यात टस्सल झाली. तर पिंपरी मतदार संघातून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे आण्णा बनसोडे यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. 21 ऑगस्ट रोजी सर्वांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले.

उद्या बालेवाडी येथील स्टेडियम याठिकाणी सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कोणाला किती मताधिक्य मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button