breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तिन्ही जागा राष्ट्रवादी लढविणार- अजित पवार यांची घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/ajit-pawar-2.jpg)
पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी कोणी रुसायचे नाही. यावेळी एकजुटीने काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा यावेळी होऊ देऊ नका, अशी तंबी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी काळेवाडीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार आण्णा बनसोडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.