चिंचवडमध्ये 6 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 6 लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना रविवारी (दि. 27) चिंचवडच्या लिंक रोड येथील लक्ष्मीनगर येथे उघडकीस आली.
याप्रकरणी प्रभाकर यशवंत दुवेदी (वय 67, रा. शंकुत विहार, फ्लॅट. नं. 2, लक्ष्मीनगर, लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 26) दुपारी प्रभाकर दुवेदी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. दुस-या दिवशी म्हणजे रविवारी सांयकाळी सहाच्या सुमारास ते घरी परतले. त्यावेळी दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसले. घरात पाहिले असता सोन्याचे आणि चांदीचे एकूण 5 लाख 94 हजार रुपयांचे दागिने नसल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी चिंचवड पोलिसांत दागिने चोरी गेल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.