चिंचवडमध्ये राहूल कलाटे तर भोसरीत विलास लांडे यांना राष्ट्रवादी-काॅंग्रेस आघाडीचा पाठिंबा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/IMG-20191009-WA0009.jpg)
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची माहिती, पिंपरीत राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकणार
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी, चिंचवड, भोसरी शहरात अराजकता वाढलेली आहे. भाजप-शिवसेनेने वाढलेला भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे असून गुन्हेगारी रोखणे काळाची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी-काॅंग्रेस महाआघाडीतर्फे चिंचवडमधून राहूल कलाटे, भोसरीत विलास लांडे पुरस्कृत केले आहे. तर पिंपरीतून आण्णा बनसोडे यांना पाठिंबा दर्शविला आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक दत्ता साने, डब्बू आसवानी, नगरसेविका मंगला कदम, नगरसेवक योगेश बहल, वैशाली काळभोर, राजू मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड भोसरी मतदारसंघात भ्रष्टाचार वाढला आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढून महिला-मुलीही सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होवूनही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. पिंपरी चिंचवड आणि भोसरीच्या विकासासाठी आम्ही अपक्ष उमदेवारांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महायुतीच्या उमेदवारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. असेही ते म्हणाले.