breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये एकच चर्चा; ‘आम्ही फसलो’, तुम्ही नका फसू!

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड येथील एका स्कूलच्या विरोधात पालकांनी फलकबाजी केली आहे. आम्ही फसलो, तुम्ही नका फसू, या आशयाचे फलक लावून शाळेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्या फलकांची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

कोरोना महामारीत सर्वत्र शाळा ऑनलाइन सुरु होत्या. ऑनलाइन शाळा सुरु असताना संपुर्ण वर्षांचे शुल्क आकारले जात आहे. याविषयी पालकांनी महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यानूसार एल्प्रो शाळेविरूद्ध पॅरेंट्‌स असोसिएशनने लेखी तक्रारीनूसार शाळेला सुनावणीला बोलावले होते. परंतु, शाळेने आमच्याकडे पालकांची एकही तक्रार नाही’, असे सांगत सुनावणीला गैरहजेरी दर्शविली.

तर कायद्याला न जुमानणाऱ्या शाळेविरूद्ध पालकांनी शाळेसमोर, चिंचवडगावातील अहिंसा चौक आणि दर्शन हॉलसमोर फलक लावले आहेत. “आम्ही फसलो, तुम्ही नका फसू! आमच्या मुलांचे भवितव्याचे काय?’, असे प्रश्‍न शाळा व्यवस्थापनाला फलकाद्वारे उपस्थित केला आहे. याबाबत स्कूलचे समन्वयक शिवप्रसाद तिवारी म्हणाले, “पालकांनी लावलेल्या फलकाबाबत मला काहीच माहिती नाही.”

संतप्त पालकांच्या प्रतिक्रिया.

शीतल शिंदे – या प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घालावे. पालकांना आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही.
उत्कर्ष वाघोलीकर – शाळा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्याला केराची टोपली दाखवत आहे. शासनाचा कुठल्याही निर्णयाला मान्य करत नाही.
इंद्रप्रकाश तिवारी – चार-पाच वर्षापासून पालकांची फसवणूक सुरू आहे. विनाकारण पालकांना वेठीस धरले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button