breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
चिंचवडमधून राहूल कलाटे ठरणार राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार
![The decision to dismiss the authority for integrated city development is right - Rahul Kalate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/rahul-kalate-12.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरला आहे. त्यामुळे शिवसेनेचे राहूल कलाटे हे आता राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार असण्याची शक्यता आहे. ही राष्ट्रवादीची नवी खेळी असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे शंकर पांडुरंग जगताप, विजय वाघमारे, राजकुमार घनशाम परदेशी व प्रकाश भाऊराव घोडके यांचे उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. त्यामुळे यांना आता निवडणूक लडविता येणार नाही.