breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चालू वर्षात घरपट्टी आणि पाणीपट्टी दरात वाढ नको – आमदार लक्ष्मण जगताप

  • नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडेल
  • आयुक्त श्रावण हार्डीकर यांना केल्या सूचना

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांसाठी 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी दर सुधारित करण्याची कार्यवाही केली जात आहे. चालू वर्षात घरपट्टीत आणि पाणी पट्टीत कोणतीही वाढ न करता पालिकेने अन्य उत्पन्नाचे स्त्रोत आमलात आणावेत. कारण, घरपट्टी आणि पाणी पट्टी वाढ केल्यास नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडेल. त्यासाठी चालू वर्षात नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार नको, असे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्राद्वारे सुचित केले आहे.

घरपट्टी हा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महत्वाचा आर्थिक उत्पन्न देणारा स्त्रोत मानला जातो. घरपट्टीच्या दरामध्ये दरवर्षी सुधारणा केल्या जातात. फेब्रुवारी 2019 अखेरपर्यंत कराचे दर निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 99 मध्ये तरतूद आहे. त्यानुसार 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता घरपट्टी दर सुधारित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे समजते. घरपट्टी हा महापालिकेचा महत्वाचा आर्थिक स्त्रोत असला तरी त्यातील वाढीव दरामुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे चालू वर्षात पालिका प्रशासनाने घरपट्टीच्या दरामध्ये कोणतीही वाढ करू नये, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.

शहरातील चार ते पाच वर्षांपूर्वीच्या असंख्य बांधकामांची महापालिकेकडे अद्याप नोंद नाही. त्याची नोंद करून त्यांना कर आकारल्यास कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते. त्यासाठी चार ते पाच वर्षांपूर्वीच्या सर्व बांधकामांची नोंद होणे गरजेचे आहे. अशा बांधकामांची नोंद करून पालिकेने कर रुपाने मिळणारे उत्पन्न वाढवावे. जुन्या नोंदणीकृत बांधकामांची कर आकारणी करू नये. त्याचबरोबर 2019-20 मध्ये पाणी पट्टीमध्ये देखील वाढ करू नये, अशी सूचना आमदार जगताप यांनी पत्रात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button