breaking-newsपिंपरी / चिंचवड

चाकण येथील कंपनीत भीषण आग, पुठ्यांचे साहित्य जळून खाक

चाकण | महाईन्यूज | प्रतिनिधी

चाकण औद्योगिक क्षेत्रातील आळंदी फाट्याजवळील कुरुळी हद्दीतील पीसीपी या पुठ्ठ्यांचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आले. आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांमध्ये कंपनीतील कच्चा पक्का माल, यंत्रसामुग्री, कार्यालय साहित्य खाक झाले. 

चाकण एमआयडीसीचा अग्नीशमन बंब, पाण्याच्या टॅंकरने पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाट्यापासून काही अंतरावर पीसीपी ( पत्ता- गट नंबर 624/ 4, 624/6 , कुरुळी ,चाकण, ता. खेड जि. पुणे) ही कंपनी आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनीमध्ये कामगार वेल्डिंगचे काम करत होते. त्यावेळी उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले.

कंपनीत मोठ्या प्रमाणावर पुठ्ठा, फोम असल्यामुळे आगीने काही क्षणांमध्ये रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती तात्काळ चाकण व महाळुंगे पोलिसांना आणि अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनेनंतर एमआयडीसी व पिंपरी चिंचवड महापालिका यांचे प्रत्येकी एक अग्निशमन बंब, सुमारे चार पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले.

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. संपूर्ण कारखाना आगीने वेढल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत होत्या. कंपनीचे वरील भागाचे भिंतीचे पत्रे फोडून आतमध्ये पाण्याचे फवारे सोडण्यात आले. आळंदी फाट्यापासून आतमध्ये असलेल्या या कंपनीकडे जाण्यासाठी अत्यंत अरुंद अंतर्गत रस्ता आहे. याशिवाय आग ज्या कारखान्याला लागली त्या भागात अत्यंत दाटीवाटीने अन्य कारखाने असल्यामुळे मदतकार्यात अडचण येत होती. एका कारखान्याची आग अन्यत्र पसरू नये, यासाठी प्रयत्न सुरू होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button