breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चांगल्या कामामुळेच रिक्षा संघटना वाढली – बाबा कांबळे

पुनवळे येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न महाराज रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन

पिंपरी | प्रतिनिधी

पुनवळे, वाकड, रावेत या भागातील शेतकरी आणि स्थानिकांनी आपल्या जमिनी विकासाठी दिल्या. या मुळे या भागात मोठ्या प्रमाणात विकास झाला. नविन रिक्षा परवानामुळे  ग्रामीण भागात देखील रिक्षा चालकाची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा चालक मालकांसाठी चांगली काम करत आहे. यामुळे रिक्षा चालकांची सर्वात मोठी संघटना म्हणुन पंचायत नावरूपास आली, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

पुनवळे येथे महाराज रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, नगरसेविका रेखा दर्शिले, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, अतुल ढवळे, एक्साईड बॅटरी युनियनचे नेते हेमंत कोमते, टाटा मोटर्स सिरीयल संघटना नेते किरण बोरगे, हभप बाबा महाराज गवारे, सचिन कोमते,  सुधीर कोमते, सामाजिक कार्यकर्ते – बाळासाहेब काटे , शिवसेना नेते विजय दर्शिले,  बाजीराव बहिरह, देविदास कोमते, रोहिदास आरसुळे, हनुमंत बादल आदी या वेळी उपस्थित होते.

हिंजवडी हे देशातील आयटी हब  असून हिंजवडी मध्ये आय टी क्षेत्रात मोठी गुंतवणुक झाली असुन या मुळे आजूबाजूच्या परिसरात विकास कामे वाढली असुन या मुळे , पुनवळे ,वाकड, रावेत या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. येथील रहिवासी नागरिकांना प्रवासी सेवा मिळाली पाहिजे यासाठी रिक्षाचालक मालकांना कायदेशीरपणे सेवा दिली पाहिजे यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी केले.

चेतन भुजबळ यांनी रिक्षा चालकांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष अनिकेत कोयते, उपाध्यक्ष नवनाथ बोरगे, खजिनदार हिरामण गवारे, सचिव नंदकुमार बोरगे, रोहिदास बिनगुडे, अण्णा जाधव,  सोमनाथ शिंदे, सोमनाथ गवारे,  सोमनाथ आवारे, राहुल मस्के,  रोहित ओव्हाळ, निखिल येवले, संभाजी म्हमाळे, नितीन शेलवणे, जुबेर सय्यद ज्ञानेश्वर चौधरी, विश्वास पाटोळे आदीसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button