घरासमोर लावलेली सॅन्ट्रो कार चोरीला
घरासमोर लावलेली सॅन्ट्रो कार चोरीला गेल्याची घटना घडली. ही चोरी शनिवारी (दि. 5) सकाळी सहाच्या सुमारास चिंचवडमधील शाहूनगर परिसरात उघडकीस आली.
धैर्यशील मोहनराव शिंदे (वय 43, रा. ओमकृपा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धैर्यशील यांची सातारा येथे शेती आहे. शेतीच्या कामासाठी ते शुक्रवारी (दि. 4) सकाळी पाचच्या सुमारास साताऱ्याला गेले. शेतीचे काम संपवून शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घरी परतले. घरी आल्यानंतर सोसायटी समोर पार्क केलेली त्यांची सॅन्ट्रो कार दिसली नाही. परिसरात त्यांनी शोधाशोध केली. कार चोरीला गेल्याची खात्री होताच त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.