breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणा-या दोघांना पोलिसांनी केली अटक
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या तरूणीला घरात घुसून आश्लिल शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी दोनजणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 17) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला
साईनाथ प्रल्हाद राठोड (वय 19) आणि मलेश गोविंद राठोड (वय 19, दोघे रा. वैदु वस्ती, पिंपळे गुरव) या दोघांना अटक झाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी तिच्या बहिणीकडे आली होती. तेव्हा साईनाथ आणि मलेश दोघेजण तिच्या घरात घुसले. साईनाथने तिचा हात पकडून आश्लिल शब्दांत शिवीगाळ केली. तिच्याशी झटापट करून विनयभंग केला. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.