breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुन्हेगार शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची तातडीने हकालपट्टी करा

  • चिंचवड विधानसभा शिवसेना प्रमुख अनंत को-हाळे यांचा तिव्र संताप
  • भ्रष्ट अधिका-याला पाठबळ दिल्याने भाजपचा केला निषेध

पिंपरी / महाईन्यूज

संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची वदनामी झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी महापालिका कामकाजात देखील अफरातफर केल्याचा संशय बळावला आहे. त्यांच्या संपूर्ण कामकाजाची आणि त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी करण्यात यावी. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यात यावा. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांनी देखील महत्वाच्या सूचना मांडल्या आहेत.

पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश नावंदर यांच्या न्यायालयात फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यांची पार्श्वभूमीच मूळात गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्यामुळे त्यांना पालिकेत कोणी विरोध करत नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल असताना देखील भाजपच्या सत्ताकाळात त्यांना शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी पदावर काम करताना कोणी विरोध केला नाही. न्यायालयात दावा प्रलंबित असताना ज्योत्स्ना शिंदे कोणाच्या अशिवार्दाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत आहेत. सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांना ही बाब आजपर्यंत कशी निदर्शनास आली नाही, हे विशेष आहे. शिंदे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेला असताना देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही, ही अत्यंत निंदनिय बाब असल्याने याचा को-हाळे आणि सौंदणकर यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे.

ज्योत्स्ना शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करा

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना नियुक्ती देताना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा का विचार केला गेला नाही. अशा बदनाम अधिका-यांच्या घोटाळेबाज कामकाजामुळे महापालिकेचे नाव राज्यभरात खराब झाले आहे. त्यांच्या कामकाजाबाबत संशय बळावला आहे. त्यांनी आजपर्यंत पालिकेत घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांचा फेरविचार करावा. त्यामध्ये अफरातफर केल्याचा दाट संशय निर्माण झाल्याने शक्य झाल्यास ते निर्णय रद्द करावेत. या प्रकरणावरून त्यांची प्रतिमा भ्रष्टाचारी झाल्याने त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. तसेच, शिंदे यांची तातडीने हकालपट्टी करण्यासाठी राज्य सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी को-हाळे आणि सौंदणकर यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button