breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुन्हेगारी विश्वात दहशत माजवणारा ‘ससा’ पुन्हा दोन वर्षासाठी तडीपार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, मारामारी यांसाखे घातक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सागर उर्फ ससा याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

सागर उर्फ ससा राजकुमार वाघमोडे (वय 23, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मागील काही महिन्यांपासून ससा पुन्हा गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. जुलै 2018 मध्ये त्याने पिंपरी पोलीस ठाण्यासमोर भरदिवसा वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवली होती. त्याचबरोबर त्याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगल, दरोड्याची तयारी, दुखापत, जबर दुखापत, धमकी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते.

यापूर्वी देखील त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तरीही न सुधारल्याने परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सशाला पुन्हा एकदा दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button