breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गाडी नावावर करून देण्याचे आमिष दाखवून घातला सहा लाखांचा गंडा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चारचाकी मोटार नावावर करून देण्याचा विश्वास दाखवून मित्रानेच मित्राला 6 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 28) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडला आहे.

गोरख बाळू भोडवे (रा. मु. पो. भोडवे वस्ती, बारामती, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अर्जुन गेनबा देशमुख (वय 48, रा. राधास्वामी निवास, कोकणे चौकाजवळ, श्रीकृष्ण कॉलनी, रहाटणी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख आणि अर्जुन यांचे पूर्वीचे मैत्रीवजा संबंध होते. गोरखला पैशाची गरज होती. त्याने अर्जून यांच्याकडून सहा लाख 30 हजार 396 रुपये घेतले. बदल्यात त्याची मोटार (एमएच 14, एफ क्यु 2129) अर्जुन यांच्या नावावर करून देण्याचा शब्द दिला. विश्वासाने दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाला असताना गोरखने पैसे घेऊनही त्याची मोटार अर्जुन यांच्या नावावर केली नाही. याप्रकरणी अर्जुन यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार वाकड पोलिसांत दिली. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button