breaking-newsपिंपरी / चिंचवड

गणेश मृर्तींचे हौदातच विसर्जन करावे – श्रावण हर्डीकर

पिंपरी ( महा ई न्यूज ) – वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्व नागरिकांनी आपले सण, उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करावेत. मांगल्याचे प्रतिक असणारा गणेशोत्सव देखील पिंपरी – चिंचवड शहरात मोठ्या भक्ती भावाने, उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. शहराच्या जीवनवाहिन्या असणा-या पवित्र इंद्रायणी आणि पवना नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सामाजिक संस्था, संघटना व उद्योजक पुढाकार घेऊन काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आसवाणी असोशिएटस्‌ आणि इनव्हायरमेंट या संस्थेतर्फे पिंपरी गावातील वैभवनगर येथे सार्वजनिक मंडळांच्या गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. याचा गणपती मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवाणी यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच खासगी जागेत गणेशमृर्ती विसर्जनासाठी लहान, मोठ्या आकाराचे एकूण चार हौद उभारण्यात आले आहेत. त्याचे उद्‌घाटन सोमवारी (दि. 17) आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आयुक्त हर्डीकर यांनी स्वहस्ते गणेश मृर्तीचे हौदात विसर्जन केले. माजी आमदार अण्णा बनसोडे, नगसेवक शीतल शिंदे, जयहिंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकाणी, जयहिंद हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button