खासदार संजय काकडे यांना पंकजा मुंडे यांच्यावरील टिका पडली महागात, पिंपरीत मुंडे समर्थकांचा संताप
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत खासदार संजय काकडे यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर भगवान बाबा महासंघाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. काकडे भाजपचे सहयोगी सदस्य असले तरी त्यांना पक्षांतर्गत कार्यप्रणालीवर बोलण्याचा काडीचा अधिकार नाही, अशा शब्दांत महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काकडे यांनी आपले शब्द त्वरीत मागे घ्यावेत, अन्यथा त्यांच्या घरासमोर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे पुणे जिल्हाअध्यक्ष प्रा. गणेश ढाकणे यांनी दिला आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी खासदार काकडे यांनी अपशब्द वापरले. त्याबद्दल काकडे यांचा शनिवारी (दि. 14) पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी जय भगवान महासंघ पुणे, भगवान सेना पिंपरी-चिंचवड, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, भगवान बाबा प्रतिष्ठान, ओबीसी संघर्ष समिती या संस्थांचे प्रतिनिधी व ओबीसी संघर्ष समितीचे आंनदा कुदळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भूजबळ, समन्वयक सुरेश गायकवाड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भगवान बाबा मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद मुंडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कायंदे, उद्धव सानप, हनुमंत घुगे, शिवाजी गिते, नाना खेडकर, महादेव मुसळे, विजय सानप, परमेश्वर दराडे, अरुण गिते, आनंदा खाडे, राजू सानप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.