breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार पूनम महाजन यांचा राष्ट्रवादीकडून पिंपरीत निषेध

भाजपची संस्कृती ज्येष्ठांचा व महिलांचा अनादर करणारी…..संजोग वाघेरे पाटील
पिंपरी (महा ई न्यूज) – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर खासदार पूनम महाजन यांनी केलेले वक्तव्य निंदाजनक आहे. भाजपा आणि आरएस्‌एस्‌ची संस्कृतीच मुळात ज्येष्ठांचा व महिलांचा अनादर करणारी आहे, असे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केले. तसेच शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून खासदार महाजन यांचा निषेध करण्यात आला.  
खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्या विषयी निंदाजनक वक्तव्य केले. त्यांच्या निषेधार्थ पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (सोमवारी) सायंकाळी 5 वाजता निषेध सभा घेण्यात आली. यावेळी खासदार पूनम महाजन विरोधात निषेधाच्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनास राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, प्रवक्ते फझल शेख, युवा नेते व नगरसेवक नाना काटे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसेवक विनोद नढे, योगेश गवळी, ज्येष्ठ नगरसेविका उषा वाघेरे, संगिता ताम्हाणे, निकिता कदम, उषा काळे, महिला सरचिटणीस कविता खराटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक संतोष कोकणे, निलेश पांढारकर, कामगार नेते रोझारिवो डिसोजा, विनोद कांबळे, गंगा धेंडे, कुणाल थोपटे, प्रशांत कडलग, दिपक साकोरे, दत्तात्रय जगताप, अमित बच्छाव, महेश माने, बाळासाहेब पिल्लेवार, अलोक गायकवाड, हर्षवर्धन भोईर, राजाराम सावंत, गोरोबा गुजर, दिपाली देशमुख, प्रियांका सुतार, सचिन मोरे, अभिजीत आल्हाट, मंगेश बजबळकर, सचिन औटे, गोपीचंद जगताप, युनिस शेख आदी उपस्थित होते.
यावेळी विशाल वाकडकर म्हणाले की, शरद पवार यांच्यामुळेच देशात प्रथम महिलांना राजकीय व शैक्षणिक आरक्षण देण्यात आले. खासदार महाजन यांच्या जन्मापूर्वी शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दुरगामी धोरणांमुळेच देशाच्या महिला राष्ट्रपती होण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला. ज्येष्ठांचा व महिलांचा सन्मान करणे, हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे. खासदार महाजन यांच्या वक्तव्यामुळे देशातील तमाम ज्येष्ठांचा व महिलांचा अपमान झाला आहे. तर खासदार महाजन यांनी केलेले हे निंदाजनक वक्तव्य निव्वळ प्रसिध्दीचा स्टंटबाजी आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button