breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधन पर्वाचे आयोजन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा-विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. ११ ते १५ एप्रिल असा ५ दिवस कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

महापालिका स्थायी समिती सभागृहात महापाैरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुलक्षणा धर-शिलवंत, गीता मंचरकर, नगरसदस्य संतोष लोंढे, सागर आंगोळकर, संदिप वाघेरे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसदस्य उत्तम हिरवे, मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, उत्तम कांबळे, निवृत्ती आरवडे, देवेंद्र तायडे आदी उपस्थित होते.

यावेळी विविध प्रबोधनात्मक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच परिसंवाद, चर्चा सत्र,
व्याख्यानमाला तसेच वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच वाहतूकीची कोंडी होणार नाही, यासाठी उपाय योजना करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, युपीएससी/एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, भव्य स्टेज मंडपाची व्यवस्था करुन संपूर्ण मंडपावर पत्रे टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचबरोबर पिण्याचे स्वच्छ पाणी व वैद्यकीय पथकाची व्यवस्था करणेबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या.

दरवर्षीप्रमाणे या प्रबोधन पर्वाचे नियोजन करण्याच्या सूचना महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांनी
अधिका-यांना दिल्या. महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. महिलांसाठी पूर्ण एक दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे. तसेच केंद्र व राज्य शासन तसेच महापालिकेचे उपक्रम जास्ती जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती देणारा स्टॉल उभारणे तसेच नौकरी व उद्योगधंदा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button