breaking-newsपिंपरी / चिंचवड
क्रांतिदिनानिमित्त महापालिकेचे क्रांतिवीरांना अभिवादन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
क्रांती दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू, क्रांतिवीर लहुजी वस्ताद, वासुदेव बळवंत फडके, शहीद भगतसिंग, हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवाद केले. चिंचवड स्टेशन चौक, महापालिका भवन, दापोडी येथील स्मारकाला पुष्पहार घालण्यात आला.
चिंचवडगांव येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके,
नगरसदस्य सुरेश भोईर, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.