breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना रुग्णांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी एक कोटींचा खर्च

पिंपरी |महाईन्यूज|

करोना संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाची चाचणी केली जाते. या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेला तपासणीपोटी एक कोटी रुपये देण्यात येणार आहे. हा खर्च सरकारी योजनांची अमंलबजावणी या लेखाशीर्षामधून करण्यात येणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर आयसीएमआरने मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून करोनाची तपासणी करण्यासाठी स्वॅब पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने नेमून दिलेल्या रुग्णालयातून घशातील नमुने तपासणीसाठी कार्यवाही केली. या आदेशानुसार या सर्व प्रयोगशाळेस महापालिकेमार्फत नमुने घेतल्यास 2 हजार रुपये आणि प्रयोगशाळेत नमुने घेतल्यास 2 हजार 500 देण्याचे महापालिकेने ठरवून दिले आहे. हे दर 30 जूनपर्यंत राहणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार संबंधित प्रयोगशाळेने महापालिकेने ठरवून दिलेलल्या रुगणालयातून घशातील नमुने तपासणी केली आहे.

करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने डायग्नोस्टिक, थायरोकेअर आणि एसआरल डायग्नोस्टिक यांना 12 जुलैपर्यंत 2 हजार रुपये प्रतिचाचणी याप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान क्रस्ना डायग्नोस्टिक यांनी 18 ऑगस्ट रोजीच्या पत्राद्वारे संशयित करोना रुग्णांच्या आरटी पीसीआर चाचणीचे दर 9 जुलैपूर्वी 2 हजार 500 रुपये आणि 12 जुलैपर्यंत 2 हजार रुपये प्रति चाचणी प्रमाणे धरण्याची विनंती केली होती. त्यानुसार, या तपासणीसाठी 1 कोटी 7 लाख 80 हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च सरकारी योजनांची अमंलबजावणी या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button