breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोना तपासणीसाठी शहरात स्वतंत्र लॅब तत्काळ सुरू करा : सिमा सावळे यांची मागणी

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना संशयीत रुग्णांचे घेतलेले घशातील द्रावाचे नमुने पुणे शहरातील प्रयोगशाळेत पाठविले असता दोन-दोन दिवस त्याचा अहवाल मिळत नाही. तसेच आगामी काळात पुण्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास सध्याच्या प्रयोगशाळेची क्षमता कमी पडण्याची शक्यता नाकारतां येत नाही.  त्यावर तोडगा म्हणून पिंपरी चिंचवड शहरासाठी महापालिकेने स्वतंत्र लॅब तत्काळ सुरू करावी अशी आग्रही मागणी भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी आज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

सावळ यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातून रोज किमान शंभर संशयीतांचे नमुने पुणे येथील नॅशनलय व्हायरॅलॅजी (एनईआयव्ही) मध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचा रिपोर्ट १२ तासात मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ४ तास नव्हे तर ४८ तासात सुध्दा अहवाल मिळत नाही. परिणामी पुढील उपचार अशक्य असतात. रुग्ण आणि डॅक्टरसुध्दा त्रस्त आहे. पिंपरी चिंचवड शहर आज २७ लाख लोकसंख्येचे आहे. या शहरासाठी एनआयव्ही च्या प्रमाणे स्वतंत्र लॅब तत्काळ सुरु करणे नितांत गरजेचे आहे.

पुणे शहरातील रुग्णांची संख्या रोज १५० ने वाढतेच आहे. तिकडे रोज संशयीतांची यादी मोठी आहे. परिणामी त्यांचे नमुने प्रथम घेतले जातात. आता पुणे शहरातील रुग्णांची संख्या ३१ मे दुपटीने वाढण्याचा अंदाज आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील कोरोना रुग्ण ३१ मे पर्यंत ९,६०० होतील असे एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे पुणे शहरातील रग्णांचाच लोड असताना पिंपरी चिंचवडचे नमुने तपासणी थांबविण्यात आले आहे. असे झाले तर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कुचंबना होणार आहे. अशा परिस्थितीत एकच तोडगा दिसतो, तो म्हणजे आपल्या शहरात स्वतंत्रप्रयोगशाळा तराय करणे. महापालिका ते काम करू शकते. भोसरी येथील नारी (नॅशनल एडस्‌ संशोधन केंद्र) संस्थेमध्ये काही नमुने तपासणीसाठी पाठवतात, पण त्यांच्याही मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत तत्काळ स्वतःची प्रयोगशाळा सुरू करा, असे सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button