breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या बातम्या वाचून 70 वयोगटातील ज्येष्ठांना मानसिक धक्का

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसिध्द होणा-या वर्तमानपत्रात दररोज कोरोनासंदर्भात आज एवढे पेशंट वाढले. एवढ्यांचा मृत्यू झाला. अशा बातम्या छापून येत आहेत. मोबाईलवर कोणाला फोन लावयाचा झाला तरी कोरोनाचीच माहिती सांगितली जाते. यामुळे बेडवर खिळून मरणयातना सहन करणा-या 70 वयोगटापुढील व्यक्तांची मानसिकता बिघडत चालली आहे. अशातच अॅम्ब्युलन्सचा कर्णकर्कश्य आवाज ऐकून रुग्णांना मानसिक धक्का बसत असल्याची बाब फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

कोरोनामुळे समाजातील वातावरण भयभीत झाले आहे. मीडियातून दररोज कोरोनाच्या स्फोटक बातम्या प्रसारित केल्या जात आहे. वर्तमानपत्रात देखील कोरोनाशी संबंधीतच बातम्या दररोज वाचायला मिळत आहे. साधा फोन करायचा झाला तरी सुध्दा मोबाईलवर कोरोनाचीच माहिती सांगितली जात आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मनाला नाहक त्रास होत आहे. -हदयविकाराने बेडला खिळून बसलेले वयोवृध्द रुग्ण यांना परिसरातून जाणा-या अॅम्ब्युलन्सचा कर्णकर्कश्य आवाज असह्य झाला आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर आघात होत असून या कारणांमुळेच भयभीत होऊन अनेकांनी आपले प्राण गमवले आहेत, असा अंदाज पानसरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे वर्तविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button