कै. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/DSC_8125.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील व कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील
त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी मनपा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. तसेच वल्लभनगर व कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुतीराव गायकवाड, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रविण सोनी, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.