breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

के़.वेंकटेशम पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

पिंपरी चिंचवडचे पहिले आयुक्त म्हणून आऱ. के़. पद्मनाभन यांची नियुक्ती

पुणे –  नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची महामार्ग विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बदली झाली आहे़. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक आऱ. के़. पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अतिरिक्त  महासंचालक (कारागृह) डॉ़ भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत़.  राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजयकुमार हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतील़. त्यांच्या जागी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे याची नियुक्ती झाली आहे़. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांची ठाणे पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे़.

अपर पोलीस महासंचालक वैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांची प्रधान सचिव, (विशेष) गृह विभाग येथे बदली झाली आहे़. प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग रजनिश शेठ यांची अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे़ . पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या मुळच्या अलाहाबाद असून त्या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत़. त्यांनी अलाहाबाद युनिर्व्हसिटीमधून पदवी घेतली आहे़. त्यांनी भूगर्भ शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे़. त्यांनी मुंबई पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे़. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे़.  त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त काम केले आहे़ . एक शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात विशेष ओळख आहे़.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button