breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महापालिकेची “धाव”; 98 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

पिंपरी – केरळ राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या नागरीकांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसाचे वेतन कपात करुन एकूण ७७ लाख ९१ हजार दोनशे चोवीस तसेच मनपातील सर्व नगरसेवकांचे एक महिन्याच्या मानधनाची रक्कम अशी एकूण २० लाख १९ हजार चारशे रुपये जमा करण्यात आले. अधिकारी आणि नगरसेवकांचे असे एकुण ९८ लाख १० हजार 624 एवढ्या रकमेचा धनादेश केरळ पुरग्रस्तांना सहाय्यता निधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज बुधवारी (दि. 12) सुपूर्द करण्यात आला.

 

याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठनेते आझम पानसरे, महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, खजिनदार नितीन समगीर, कार्याध्यक्ष शिवाजी येळवंडे, मुकुंद वाखारे, संजय कुटे, बालाजी अय्यंगार आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button