breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केरळातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी “भाऊ”, “दादां”नी कसली कंबर

  • आर्थिक व वस्तू स्वरुपात मदतीचे आवाहन
  • भाजप कार्यालयासह आमदार जगताप, लांडगे यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार वस्तू

पिंपरी – पुरस्थितीमुळे नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असलेल्या केरळमधील नागरिकांना मदत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपने पुढाकार घेतला आहे. पुरामुळे बेघर झालेल्यांना दैनंदीन गरजेचे आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संयोजक सदाशिव खाडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून मदत स्वरुपातील संकलीत वस्तू व तत्सम साहित्य केरळातील पुरग्रस्तांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

 

नैसर्गिक प्रलयामुळे केरळ सध्या भयंकर नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. संपूर्ण राज्याला पुराचा फटका बसला असून किमान ४०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून लाखो लोक बेघर झाले आहेत. केरळमधील पुरस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या वतीने केरळच्या बंधु-भगिनींना या संकट काळात वस्तू रुपाने मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट, कपडे, तांदूळ, साखर, मीठ, डाळी, बिस्किटे, स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल बॉक्स. तसेच, ब्लिचिंग पावडर, फिनेल डेटॉल, सफाईची रसायने उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून हे मदतकार्य केरळातील नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

 

इच्छुकांनी मदतकार्यात भाग घेऊन मदत स्वरुपातील वस्तू आमदार जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयात तसेच, आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील कार्यालयात आणि मोरवाडीतील भाजपच्या शहर कार्यालयात जमा कराव्यात. तसेच, आर्थिक मदत ही के. जी. मरार स्मारक ट्रस्ट, अकाऊंट क्रमांक 57037146763, आयएफएसी कोड एबीआएन 0000941, एसबीआय, मेन शाखा स्टॅच्यू, त्रिवेंद्रम या क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन खाडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button