केंद्रीयमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात पैसे देवून आणले महिलांना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190610-WA0014-300x225.jpg)
- गर्दीं जमवण्यासाठी स्थानिक भाजपच्या पदाधिका-यांनी केला प्रकार
- तब्बल 300 महिलांना पाचशे रुपयांप्रमाणे वाटले पैसे वाटले
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ह्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज (सोमवार) संत तुकाराम नगरातील आचार्य अत्रे सभागृहात ठेवण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना कार्यक्रमानंतर पैसे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामध्ये प्रत्येक महिलेला 500 रुपये दिल्याचे उघड झाले आहे. तर काही महिला पैसे मिळाल्या नाहीत म्हणून कार्यक्रम झाल्यानंतरही बराच वेळ सभागृहात थांबल्या होत्या. या प्रकरणावर रावसाहेब दानवे यांनी मीडियावरच आरोपकडून बोलण्यास नकार दिला.
पिंपरी चिंचवड शहर भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी पैसे देऊन महिला बोलविल्यात आल्या होत्या. अनेक महिलांना भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांनी प्रत्येकी महिलेला ५०० रूपये वाटप करत असल्याचे निर्देशनास आले.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात एक खासदार, दोन आमदार, राज्यमंत्री पदे असलेले दोन पदे, महापाैर, उपमहापाैर, तब्बल 82 नगरसेवक, भाजप शहरचे सर्व पदाधिकारी एवढे संख्याबळ आहे. परंतू, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सत्कारांच्या कार्यक्रमाला पैसे देवून महिला आणण्याचा प्रकार केला. त्यामुळे खरंच भाजपला मानणारा वर्ग कुठे आहे, असा सवालही विचारला जात आहे.