breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्राच्या कामगार कायद्यांना विरोध; देशव्यापी संपासाठी कामगारात जनजागृती

पिंपरी |महाईन्यूज|

केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार कायद्यांना संघटितपणे विरोध करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.26) कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीने पुकारलेला संप यशस्वी करण्यासाठी कामगारांशी संवाद साधत या कायद्यांविरोधात जागृती करण्याचे काम सध्या सुरु आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगारांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी फोनवर संपर्क करण्यावर भर दिला जात आहे.

कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीमधील सर्वच कामगार संघटनांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी सबंधित कामगारांशी संवाद साधत आहेत.

या कामगार कायद्यांना विरोध करत असतानाच करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेण्याची सूचना दिली जात आहे. येत्या गुरुवारी (दि.26) या कामगार कायद्यांविरोधात केले जाणारे आंदोलन हे शांततामय पद्धतीने असणार आहे, अशी माहिती कृती समिती व आयटक राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल रोहम यांनी दिली.

कृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव औद्योगिक वसाहतींमधील कामगारांशी संवाद साधला जात आहे. त्याकरिता कामगार कायदे कामगार चळवळीला कसे मारक आहेत, याची माहिती देणाऱ्या समितीच्या पुस्तिकांचे वितरण केले जात आहे. या देशव्यापी संपामध्ये केवळ औद्योगिक क्षेत्रातीलच नव्हे, तर खासगीकरण केलेल्या केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button