breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कृषी महाविद्यालयाचे 2019-20 चे शिष्यवृत्ती अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

पिंपरी / महाईन्यूज

महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांचे प्रलंबित सण 2019 – 2020 शिष्यवृत्ती योजनेचे अनुदान प्रत्येक विद्यार्थांच्या खात्यामध्ये वर्ग होण्याबाबतचा विषय मार्गी लावण्यात कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेला यश आले आहे. त्यासाठी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी पुठपुरावा केला आहे.

महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षामध्ये शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनांचा विद्यार्थ्यांना  अजून पर्यंत लाभ मिळालेला नव्हता कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेमार्फत प्रयत्न करन्यात आले.

महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांचे शिष्यवृत्ती योजनेचे अनुदान प्रत्येक विद्यार्थांच्या खात्यामध्ये वर्ग होण्याबाबत कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेने पाठपुरावा केला ,संघटनेमार्फत 25 सप्टेंबर 2020 रोजी मा.ना. उपमुख्यमंत्री अजित पवार ,मा. ना.कृषिमंत्री दादासाहेब भुसे  यांना  पत्रान्वये कळवले होते याची दखल माननीय मंत्री महोदयांनी घेतली व त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठवली.

संघटनेने पाठपुरावा करत माननीय महासंचालक  तसेच संचालक माननीय हरीहर कौसडीकर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पत्रान्वये संपर्क केला  अखेर संघटनेच्या मागनीला प्रतिसाद मिळत संशोधन परिषदेकडुन  येत्या १५ दिवसात विद्यार्थ्यांचे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनांचे अनुदान वर्ग करन्यात येईल असे पत्र संघटनेस देण्यात आले.

 योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्या समवेत, सचिव गणेश बाबर, खजिनदार विठ्ठल रांजणे ,उपाध्यक्ष मिलिंद यादव ,सदस्य जयवंत पवार, सदस्य प्रमेय आर्यमाने, सदस्य लक्ष्मण निंबाळकर, सदस्य संजय जाधव, सदस्य ऋतुराज फडतरे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मंगेश निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष यादव सोळस्कर, ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष दौंडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सचिन कारेकर, युवानेते ऋषिकेश मस्के, युवा नेत्या अश्विनी करे, पुणे जिल्हाउपाध्यक्षा ऋतुजा भोसले, युवानेते महेश गोळे, यूवानेते सर्वजीत बोंडगे, युवानेते राहुल गायकवाड, युवानेते सोमनाथ गायकवाड, युवानेते आकाश पाटील, युवानेते भीम इंगळे, युवानेते अभिषेक वीर, दिगंबर शेटे, सुजीत घोगरे कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेच्या वतीने माननीय वित्तमंत्री नामदार अजित दादा पवारसाहेब व माननीय कृषीमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचे संघटनेच्यावतीने आभार मानतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button