breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कासारसाई बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

पिंपरी – कासारवाई येथील दोन मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली असून बलात्कार दोघांनी नाही तर चार जणांनी मिळून केला असल्याचा धक्कादायक खुलासा पीडित मुलीने केला आहे.

सुमीरन गुरुदास गायकवाड (वय 18), सोमनाथ अतिष वाघोले (वय 23, दोघे रा. दारुंब्रे, मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हिंजवडीजवळील कासारसाई परिसरात राहणाऱ्या शेतमजुरांच्या दोन मुली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने घराजवळील मंदिरासमोर खेळत होत्या. त्यांच्या घराजवळ असलेल्या साखर कारखान्याजवळ चार जणांनी मिळून त्या मुलींना चॉकलेटचे अमिश दाखविले आणि मंदिराच्या मागच्या बाजूला येण्यास सांगितले. चॉकलेट मिळणार म्हणून दोघीही मंदिराच्या मागे गेल्या. त्यावेळी आरोपींनी दोघींना मंदिराच्या मागे असलेल्या दाट झाडीमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर दोघांनी मिळून बलात्कार केला. त्यामुळे तिला फार मोठा धक्का बसला. दोघींनाही मानसिक आणि शारीरिक इजा झाली. दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील एकीची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याने कोमामध्ये गेली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

घडलेला प्रसंग घरच्यांना समजला तेंव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला, मात्र पोलिसांनी त्यांना विश्वास दिला. त्यामुळे मुलीच्या आईने फिर्याद दिली. एक पीडित मुलगी बोलू शकत असल्याने तिच्या मदतीने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकजण सज्ञान आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर जखमी मुलीने दिलेल्या माहितीनुसार आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button