कसबा विधानसभा मतदारसंघात गडाळे परिवारातफें ‘एक हात माणुसकी’चा
सव॔धमींय शेकडो कुटूबियांच्या घरातील चुली पेटवल्या
पुणे – कोरोना संकटामुळे देशासह राज्यात लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या स्थितीत गोरगरीबासह सव॔सामान्य नागरिकांच्या घरावर आथिंक संकट कोसळले आहे. अनेकांच्या घरातील अत्यावश्यक साहित्य संपल्याने चुली बंद राहू लागल्या आहेत. या संकटाच्या काळात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात गडाळे परिवार ‘एक हात माणुसकी’च्या नात्याने मदतीला धावून आले आहे. सव॔धमींय शेकडो कुटूबियांच्या घरातील चुली पेटवून मदतीचा हातभार लावला आहे. दरम्यान स्वखर्चाने पोलिसांना फेसशिल्ड, मास्क आणि सव॔ समाज घटकातील नागरिकांना धान्य, किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेविका सुनंदा सतीश गडाळे, युवक नेते तेजस विजय गडाळे, गौरी सणस, तुषार गडाळे मिञ परिवारांकडून नागरिकांमध्ये सोशल डिस्टनस ठेवून साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातील रविवारपेठ, गणेशपेठ, बुधवारपेठ आदी परिसरात संकट समयी सामाजिक बांधिलकी जोपासत गडाळे परिवार समाजातील गरजू घटकांच्या मदतीला धावून आले आहे. कोरोना संकटामुळे सव॔सामान्य घरातील चुली पेटवण्यासाठी त्यांनी एक हात माणुसकीचा पुढे केला आहे.
सव॔ धमींय शेकडो सव॔सामान्य कुटूबियांना धान्य आणि किराणा साहित्याचे एकञित किट बनवून वाटप केले आहे. यामध्ये पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक किलो तेल, शेंगदाणे चटणी, लोणचं बाॅटल व मास्क, कापडी पिशवी दिली आहे. तसेच समाजाची सुरक्षा करणा-या पोलिसांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप केले आहे.